सिल्लोड (प्रतिनिधी) आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील ईदगाह परिसरात नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध सोयीसुविधा व उपाययोजनांची नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ईदगाह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करून आढावा घेतला.
बकरी ईद निमित्त ईदगाह येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव पारंपरिक पद्धतीने विशेष नमाज अदा करतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, वाहतूक नियंत्रण तसेच सुरक्षा व्यवस्था आदी आवश्यक उपाययोजना नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व व्यवस्था वेळेत आणि सुरळीत पार पाडण्यासह बकरी ईदच्या अनुषंगाने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्या असे निर्देश प्रशासनास दिले.
याप्रसंगी पोलीस उप निरीक्षक बाबू मुंढे, ज्ञानेश्वर कायंदे नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी अजगर पठाण,
प्रशासकीय अधिकारी आयुब बाबा, जुबेर सिद्दीकी, वीज वितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता धम्मलाल म्हस्के, नगरसेवक रउफ बागवान, आसिफ बागवान, शेख इम्रान (गुड्डू), सत्तार हुसेन, डॉ. फेरोज खान, सय्यद पाशु, शेख सलीम हुसेन, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष हाजी मोहंमद हनिफ, शेख अय्युब, मुश्ताक देशमुख, शिवा टोम्पे, फहिम पठाण, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक अन्वर पठाण, शेहबाज पठाण, लाईनमन समाधान नवगिरे, सलमान शेख, कैलास आहिरे आदींची उपस्थिती होती.















